बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे स्नेहसंमेलन 27 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4.00 वा. आयोजित करण्यात आले होते. पण बेळगाव येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचा शतकपूर्ती समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार इतर कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे.. त्यामुळे हे स्नेहसंमेलन शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी ज्योती महाविद्यालय या नियोजित स्थळी सायंकाळी 4.00 वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे आय.आर.एस श्री. आकाश चौगुले उपस्थित राहणार असून करिअर व स्पर्धा परीक्षा याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व मराठी प्रेमी नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, गजानन सावंत, नीला आपटे, प्रतापसिंह चव्हाण व आयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.