
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर यांच्यातर्फे आयोजित आणि श्रीराम बिल्डर्स पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
श्रीराम सेना हिंदुस्थान, येळ्ळूर यांच्यातर्फे नुकत्याच आयोजित क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते श्रीराम बिल्डर्सचे मालक गोविंद टक्केकर हे होते. त्यांनी विजेत्या व उपविजेत्या संघासाठी यांनी अनुक्रमे 25000 व 15000 रुपयांचे बक्षीस पुरस्कृत केले होते. त्यामुळे स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे बिल्डर व अभियंता गोविंद टक्केकर यांच्या हस्ते पार पडला. अलीकडच्या काळात राजकारण व समाजकारणात भरीव योगदान देणारे अभियंता गोविंद टक्केकर हे क्रीडाप्रेमी देखील आहेत. पाणी टंचाईच्या काळात बेळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वखर्चाने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या अभियंता टक्केकर हे क्रीडा क्षेत्राला देखील प्रोत्साहन देत असतात. त्याच अनुषंगाने त्यांनी यंदा ग्रामीण भागातील तीन क्रिकेट स्पर्धांचे प्रमुख पुरस्कर्तेपद भूषविले आहे.
सदर तीन क्रिकेट स्पर्धांपैकी येळ्ळूर येथील स्पर्धेसाठी त्यांनी वरील प्रमाणे बक्षीस ठेवले होते. त्याचप्रमाणे देसूर येथील क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्या उपविजेत्या संघासाठी अनुक्रमे 25000 व 15000 रुपये तर सुळगा येथील क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या उपविजेत्या संघासाठी अनुक्रमे तब्बल 51000 रुपये व 31000 रुपयांचे पारितोषिक अभियंता गोविंद टक्केकर यांनी आपल्या श्रीराम बिल्डर्स फर्मच्यावतीने पुरस्कृत केली होती.

Belgaum Varta Belgaum Varta