Monday , September 21 2026
Breaking News

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्यावतीने सन्मान

Spread the love

 

कावळेवाडी.. येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांच्या हस्ते केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक साहेब गोवा यांचा सत्कार सावंतवाडी येथे करण्यात आला. ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरील ज्ञानदीप पुरस्कार दरवर्षी दिले जातात सलग अठरा वर्षे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रांत ज्ञानदीपचे योगदान मोठे आहे.
या निमित्ताने ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा २०२४ सावंतवाडी येथे २५ डिसेंबरला आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व चंदगडचे माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता.
यावेळी ज्ञानदीपचे संस्थापक वाय. पी. नाईक यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जावेद शेख, उदयकुमार देशपांडे चंदगड, सचिन बल्लाळ जि.प. सदस्य कोल्हापूर, एस आर मांगले, निलेश पारकर, तुकाराम बेनके, प्रदीप सावंत, विठ्ठल कदम, भरत बाळेकुंद्री, एस व्ही भुरे, विनायक गावस, पत्रकार दीपक गावकर, अभिमन्यू लोंढे -दोडामार्ग‌‌‌ रेश्मा भाईडकर, हरिश्चंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *