
बेळगाव : येथील ‘मराठा मंडळ काँलेज आँफ फार्मासी, बेळगाव आणि ‘नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंडळ या संस्थेच्या ९४ व्या वर्धापनदिनानिमित्त काँलेजमधील कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर ३ जानेवारी रोजी आयोजित केले होते.
या शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. जगदीश पाटील यांनी नेत्र तपासणी केली, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. उदय कोळकर लाभले होते.
समारोप प्रसंगी फार्मासी काँलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी ‘नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालय’च्या डॉक्टरांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल आभार मानले.
या शिबीराचा बहुसंख्येने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी आपली नेत्र तपासणी करून घेऊन लाभ घेतला.

Belgaum Varta Belgaum Varta