बेळगाव : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्यातर्फे सुरू झालेली पालखी परिक्रमा महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून दिनांक 13 रोजी दाखल झाले असून विविध ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.
महाद्वार रोडला विशेष कार्यक्रम
महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ आराधना केंद्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता येणाऱ्या पालखीचे स्वागत बेळगावच्या महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांच्याबरोबर नगरसेविका नेत्रावती भागवत, पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर व व्हा. चेअरमन सुवर्णा शहापूरकर, मराठा बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील, व्हा. चेअरमन शेखर हंडे, बसवेश्वर बँकेचे चेअरमन रमेश कळसन्नावर व बाळाप्पा कग्गनगी, दैवज्ञ बँकेचे व्हाईस चेअरमन मंजुनाथ शेठ, माजी आमदार अनिल बेनके यांच्याबरोबरच पंढरी परब, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, अनिल शहा, सी के पाटील व मारुती कडोलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाद्वार रोड येथे पालखीचे पूजन झाल्यानंतर पालखी महाद्वार रोड, तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, हेमू कलानी चौक, शेरी गल्ली, शनी मंदिर, फुलबाग गल्ली तून तानाजी गल्लीत जाऊन स्वामी समर्थ आराधना केंद्रावर दिसावेल. त्यादिवशी रात्री सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून 16 जानेवारी रोजी पहाटे युवराज चौगुले यांच्या हस्ते अभिषेक होईल. नागरिकांनी उपस्थित राहून पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी समर्थ आराधना केंद्राचे सुनिल चौगुले यांनी केले आहे.