Friday , March 6 2026
Breaking News

दोन मुलींवर सामूहिक अत्याचार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक

Spread the love

 

बेळगाव : रायबाग तालुक्यातील सवसुद्दी गावाजवळील डोंगराळ भागात दोन मुलींवर सामूहिक अत्याचार झाला असून तिघांनी मिळून अत्याचार केला आहे. या अमानुष घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अभिषेक, आदिल जमादार आणि चालक कौतुक बडिगेर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणाबाबत बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, आरोपी अभिषेकची एका मुलीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भेट झाली. त्याने मुलीला सांगितले की आपण सौंदत्तीला जात आहोत. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, पीडित मुलीने तिच्या मैत्रिणीला सोबत घेतले आणि दोघेही बसस्थानकाकडे निघाले. तेथे आरोपी अभिषेक पीडित मुलींना अर्टिगा कारमध्ये घेऊन गेला. तिन्ही आरोपी एर्टिगा कारमध्ये होते. पीडित मुलींना रायबाग तालुक्यातील सवसुद्दी गावाजवळील डोंगराळ भागात नेण्यात आले. त्यांनी ३ जानेवारी रोजी दुपारी मुलींवर अत्याचार केला. तक्रार करणाऱ्या मुलीवर अभिषेकने तर कार चालक कौतुक बडीगेर याने मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, आदिल जमादारने गाडीत बसलेल्या तरुणीवर बलात्कार केला. आरोपींनी त्यांच्या मोबाईल फोनवर व्हिडिओ बनवला आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल केले. पुढे त्यांनी मुलींना गोव्यात येण्यासाठी ब्लॅकमेल केले.

पीडित मुलींनी याबाबत घरी माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलगी तिच्या चुलत भावासह आली आणि तिने १३ जानेवारी रोजी हारुगेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर २४ तासांत दोन आरोपींना अटक करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

कडोलीत उद्या मराठी भाषा गौरव दिवस

Spread the love  कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे शनिवार दि. 7 मार्च 2026 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *