येळ्ळूर : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने 17 वे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाची बैठक रविवार ता. 20 रोजी सायंकाळी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी साहित्य संमेलन आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साहित्य संमेलनाची परंपरा खंडित न करता साहित्य संमेलन आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. तसेच संमेलन दोन सत्रात घेण्याचे ठरविण्यात आले. पहिल्या सत्रात अध्यक्षीय भाषण व दुसऱ्या सत्रात हास्यदरबार हा विनोदी कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले. संमेलन हे श्री शिवाजी विद्यालयांमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले. संमेलन सकाळी 10-00 ते दुपारी 2-00 वाजेपर्यंत घेण्याचे ठरविण्यात आले. कोरोनाच्या महामारिमुळे सरकारने घालून दिलेल्या नियमानुसारच संमेलन घेण्यात येणार आहे. ग्रामीण मराठी साहित्य संघाने गेली सोळा वर्षे सातत्याने दर्जेदार साहित्य संमेलने आयोजित केली आहेत. प्रत्येक संमेलनात अभिनेता अथवा अभिनेत्री उपस्थित राहत असे. येळ्ळूरच्या साहित्य संमेलनात अनेक दिग्गज साहित्यिक व सूप्रसिद्ध अभिनेते व अभिनेत्री यांचे पाय लागले आहेत, असे विचार अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे गत वर्षापासुन मोठ्या प्रमाणात साहित्य संमेलन आयोजित करता आले नाही, अशी खंत संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांनी व्यक्त केली. पण मराठी भाषेसाठीची ही चळवळ आम्ही अशीच चालू ठेवणार आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. संघाचे सचिव डॉ. तानाजी पावले यांनी गतवर्षाचा हिशोब सादर केला. यावेळी बैठकीला रमेश धामणेकर, परशराम बिजगरकर, सुभाष मजूकर, कृष्णा टक्केकर, परशराम धामणेकर आदी यावेळी उपस्थित होते. शेवटी सचिव डॉ. तानाजी पावले यांनी आभार मानले.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …