
बेळगाव : बेळगुंदी येथील श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी व मुंबईतील महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित १९ वे साहित्य संमेलन २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. संमेलनाच्या शामियाना उभारणीचा मुहूर्तमेढ रोपण कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला. यावेळी निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. मरगाई देवस्थान परिसरात हा कार्यक्रम झाला. ग्रामस्थ कमिटी अध्यक्ष दयानंद गावडा अध्यक्षस्थानी होते. रविकिरण सोसायटीचे अध्यक्ष मारुती चव्हाण व विमल चव्हाण यांच्या हस्ते मुहूर्तमेढ पूजन करण्यात आले. यावेळी रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीचे सर्व पदाधिकारी तसेच साहित्य प्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Belgaum Varta Belgaum Varta