
बेळगाव : येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य फलक हटविल्यानंतर झालेल्या दगडफेक आणि लाठीमार प्रकरणी दाखल साऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या खटल्याचा निकाल आज जाहीर झाला असून या खटल्यातील सर्व 26 संशयीतांची बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने आज सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य नामफलका वरून झालेल्या दंगली प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी 30 जणांवर दाखल केलेल्या गुन्हा क्र. 166 मधील निर्दोष मुक्तता झालेले संशयित 26 जण पुढीलप्रमाणे आहेत. नामदेव विठ्ठल कदम, नागराज दौलत कुगजी, हनुमंत लुमान्ना कुगजी, राजू ज्योतिबा नायकोजी, आनंद यल्लाप्पा मुचंडी, मारुती महादेव अष्टेकर, जयसिंग यल्लाप्पा अष्टेकर, दीपक बाबुराव खादरवाडकर, पवन गजानन पोटे, उत्तम तुकाराम धामणेकर, जयवंत गंगाराम टक्केकर, सुनील गुरुराज मुतगेकर, सदानंद यल्लाप्पा पोटे, प्रशांत शंकर टक्केकर, परशुराम यल्लाप्पा धामणेकर, राजू विठ्ठल मासेकर, पुंडलिक विष्णू जाधव, परशुराम गणपती जाधव, बाळू शंकर धामणेकर, रजत परशुराम संभाजीचे, कपिल मल्लाप्पा भोई, बसवराज शिवाप्पा कलमठ, विकास विलास नंदी, परशुराम यल्लाप्पा नंदी, विलास मोनाप्पा नंदी, अतुल नारायण मुचंडी. सदर खटल्यातील उर्वरित संशयित सुधीर परशुराम धामणेकर, हनुमंत फकीरा धामणेकर व सुरज यल्लाप्पा घाडी यांना खटल्यातून वगळण्यात आले असून मनोहर यल्लाप्पा मजुकर याचे निधन झाले आहे. कांही वर्षांपूर्वी बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावाच्या वेशीवरील महाराष्ट्र राज्य फलक हटवल्यानंतर दंगल उसळली होती. त्यावेळी पोलिसांनी 30 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी तिघांना यापूर्वीच न्यायालयाने खटल्यातून वगळले होते, तर एकाचे निधन झाले आहे. त्यामुळे 26 जणांविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यात गेल्या 7 जानेवारी 2025 रोजी झालेल्या सुनावणी वेळी संशयीतांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर बुधवारी 15 जानेवारी रोजी संशयीतांतर्फे वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता. या खटल्याचा आज निकाल जाहीर झाला असून बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाने सर्व 26 संशयीतांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयीतांच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर व ॲड. शाम पाटील यांनी काम पाहिले. यावेळी वकील मारुती कामाणाचे देखील उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta