बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्त्वाची बैठक सोमवार दि. 27/01/2025 रोजी सायंकाळी येळ्ळूर विभाग कार्यालय बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीला येळ्ळूर मधील आजी- माजी सदस्य ग्राम पंचायत तसेच गावातील, जेष्ठ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी येळ्ळूर विभाग म. ए. समितीची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित युवा व जेष्ठ कार्यकर्त्यांनी चर्चेमध्ये भाग घेतला होता. जास्तीत जास्त युवकांना कमिटीमध्ये स्थान देण्यात यावे व पुढील काळात युवा वर्ग समितीशी एकनिष्ठतेने काम करेल असे विचार काही युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावर चर्चा करण्यासाठी पुढील सोमवार दिनांक 03/02/2025 रोजी सायंकाळी ठीक 7.00 पुन्हा बैठक होणार असून या बैठकीला सर्व युवा, जेष्ठ, आजी- माजी लोकप्रतिनिधीनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी शांताराम कुगजी होते. तसेच माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, शेकापचे विलास घाडी, वाय. सी. इंगळे, परशराम घाडी, तानाजी हलगेकर, रमेश मेणसे, ग्राम पंचायत सदस्य, सदस्या, माजी ग्राम पंचायत सदस्य, जेष्ठ नेते व समितीनिष्ठ युवा कार्यकर्ते उपस्थित होते.