
बेळगाव : घरातील मंडळी बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना सरस्वतीनगर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथे आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी अंदाजे 250 ग्रॅम सोने, 40,000 रुपये रोख आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा अंदाज आहे.

चोरट्यांनी डल्ला मारलेले घर अँथनी डिक्रूझ यांच्या मालकीचे असून ते सध्या राजस्थानमध्ये आहेत. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अल्ताफ मुल्ला आणि पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याद्वारे तपास कार्य हाती घेतले आहे. यावेळी ठसे तज्ञांसह पोलीस श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाची कसून तपासणी केली आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पुरावे गोळा केले आहेत. भरवस्तीतील घरफोडीच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta