Sunday , September 8 2024
Breaking News

हर्षच्या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांचा भव्य निषेध मोर्चा

Spread the love

बेळगाव : शिमोगा येथे बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येच्या निषेधार्थ बेळगावात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढून आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.
शिमोगा येथे बजरंग दल कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येचे संपूर्ण कर्नाटकात संतप्त पडसाद उमटत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी आज कर्नाटकात आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार बुधवारी बेळगावात विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढला. एका खुल्या वाहनात हर्षचे छायाचित्र असलेला भव्य बॅनर लावून, ‘अमर रहे, अमर रहे, हर्ष अमर रहे’ आदी घोषणा देत, भगवे झेंडे फडकावत, गळ्यात भगवी उपरणी, शेले घालून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हर्षच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, एडीपीआय, पीएफआय या संघटनांवर बंदी घाला अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हरिगुरु महाराज म्हणाले, धर्म, राष्ट्राच्या हितासाठी प्रामाणिक कार्य करणाऱ्या सिंहासारख्या निधड्या हर्ष या कार्यकर्त्याची मुस्लिम संघटनांच्या काही गुंडांनी हत्या केली आहे. समस्त हिंदू समाज, सकल साधू समाज याचा तीव्र निषेध करतो. हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असताना ही घटना घडणे असह्य आहे. हर्षच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली नाही तर संपूर्ण हिंदू समाज पेटून उठेल असा इशारा त्यांनी दिला.
त्यानंतर बोलताना विहिंप नेते कृष्णा भट म्हणाले, हर्षच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना अत्यंत कठोर शिक्षा केली पाहिजे. राज्यात 18 हुन अधिक हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. हे सगळे जिहादी मुस्लिमांमुळे घडत आहे हे सत्य आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत, हत्या केल्यानं केवळ तुरुंगात डांबून उपयोग नाही तर त्यांचा एन्काऊंटर करावा अशी मागणी भट यांनी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निषेध मोर्चा आल्यावर हर्षच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या निदर्शनात विहिंप आणि बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *