
बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि श्री समादेवी संस्थान समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा शनिवार दि. 8 ते मंगळवार दि.11 फेब्रुवारी या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. उत्सव काळात वरील चार दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 8 रोजी उत्सवाला प्रारंभ होणार असून सकाळी 6 ते 7 चौघडा व काकड आरती, सकाळी 7 ते 12 कुंकुमार्चन, सकाळी 11 वाजता श्रीदेवी दरबाराचे उद्घाटन होणार असून यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सनातन संस्थेच्या सौ अर्चना घनवट उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 ते 3प.पु. श्री. कलावती माता यांचे भजन, दुपारी 3 ते 4 स्वर गंधा भजनी मंडळ यांचे भजन, संध्या. 4 ते 5 सौ यमनक्का भजनी मंडळ यांचे भजन, संध्या. 5 ते 6 वा.श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचा सत्संग, संध्या.6 ते 7 वा. दीपा तबलावादन यांच्याकडून भक्ती संगीत, 7 ते 9 वा. श्री ऋषिकेश नागेश हेर्लेकर यांचा संगीत संध्या गायन कार्यक्रम. रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 7 वा. चौघडा व काकड आरती, सकाळी 7 ते 12 वा. लक्ष पुष्पार्चन, दुपारी 2 ते 3 प.पु. कलावती माता यांचे भजन दुपारी 3 ते 4 स्वामी विवेकानंद भजनी मंडळ यांचे भजन, संध्या 4 ते 5 वा. भक्ती संस्कृती भजनी मंडळ यांचे भजन, संध्या. 5 ते 6 स्वर गंधा भजनी मंडळ यांचे भजन. संध्या. 6 ते 7 श्री गजानन महाराज भजनी मंडळ यांचे भजन. संध्या. 7 ते 9 वा. सुगम संगीत सांस्कृतिक कार्यक्रम. सोमवार दि.10 रोजी सकाळी 6 ते 7 चौघडा व काकड आरती, सकाळी 7 ते 11 श्रीला महाभिषेक, दुपारी 12 वा. श्री ला मिष्ठान्न व महानैवेद्य, दुपारी 2 वा. पासून ओटी भरण्यास प्रारंभ, संध्या. 3 ते 4 वा. पुराण वाचन, संध्या.4 ते 8 वा. श्री ची पालखी प्रदक्षिणा. पाचवी प्रदक्षिणा समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली नार्वेकर गल्ली श्री समादेवी मंदिर. पालखी सोहळ्यानंतर पावणी कार्यक्रम पार पडणार असून यावेळी श्री च्या नवरात्रातील देवीला परिधान केलेल्या साड्या खण व देवी समोरील श्री फळे तसेच देवीकडील फळफळावळे यांचा जाहीर रीतीने जास्तीत जास्त मागणी करणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. मंगळवार दि.11 रोजी सकाळी 6.30 ते 11 वा. पर्यंत नवचंडीका होम करण्यात येणार असून त्यानंतर 12 ते 3 वा. श्री समादेवी सभागृहात महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर उत्सवाची सांगता होईल. तरी उत्सव काळातील होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना समाज बांधव तसेच भक्त मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतुरकर, वैश्यवाणी युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुळवी, सचिव रवी कलघटगी, वैश्यवाणी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. अंजली किनारी व सेक्रेटरी वैशाली पालकर यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta