खानापूर : केसरी समर्थ युवा व महिला संघ मोहीशेत व श्री ब्राह्मणी देवी स्पोर्ट्स क्लब आक्राळी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे आक्राळी ता. खानापूर येथे आयोजित केलेला हळदी कुंकू कार्यक्रम 26/01/2025 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजा प्रभुत्व एकता आत्मनिर्भर महिला व युवा यांना प्रेरणा देण्यासाठी सदरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात थाटात संपन्न. झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावप्रमुख श्री. कोमा मिराशी हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ.उज्वला गावडे, बेळगाव, सौ. एलीना बोर्जिस खानापूर, श्री. एल डी पाटील गर्लगुंजी माजी मुख्याध्यापक व ज्येष्ठ नागरिक संघटना खानापूरचे प्र. संघटक व संयोजक समाजसुधारक श्री. खेमराज गडकरी घोटगाळी, श्री. गोविंद पाटील तोराळी, श्री. विनोद कुराडे पुणे, सौ. आर. एन. पाटील मुख्याध्यापिका, अंजना देसाई, रामाका हनंबर, पोलीस अधिकारी, वन अधिकारी, गावची पंच कमिटी, पंचायत सदस्य यासह आजूबाजूचे आजूबाजूच्या खेड्यातील संघप्रमुख महिला ही होत्या.
कार्यक्रमांमध्ये ता. खानापूर व परीसरातील महिला अधिक संख्येने उपस्थित होत्या, कार्यक्रमात श्री. एल. डी. पाटील गर्लगुंजी माजी मॉडेल मुख्याध्यापक हलशी रा. खानापूर या सरांनी ईशस्तव स्वागतगीत संस्कृत श्लोक मंत्रोचार
केले. दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते केले, संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण जयवंत खांडेकर हे आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की, संघाचा हा आठवा वर्षाचा हळदी कुंकू कार्यक्रम करत आहोत. पंचायत हद्दीतील येणाऱ्या छोट्या मोठ्या खेड्यातुन एकूण 13 महिला संघ केले असून महिलांना सक्षम, संस्कार व संस्कृती निसर्गाचे संवर्धन स्वावलंबन व सबलीकरण व दारिद्र्यातून श्रीमंतीकडे कसे जायचे? त्यांना होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज कसे उठवायचे? त्यांना स्वावलंबी कसे राहायचे? या उद्देशाने त्यांना योग्य मार्गदर्शन प्रमुख पाहुण्यांच्या कडून मिळावं त्यांचे अनुभव त्यांचे विचार मिळावे, वर्षातून एकदा सर्वांनी एकत्र यावं, या उद्देशाने हा हळदी कुंकू कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत असे सांगितले.
उज्वला गावडे यांनी हळदी कुंकूचे महत्त्व मापक शब्दात धार्मिक पद्धतीने समजावून सांगितले. त्यानंतर एलिना बोर्जिस आपले मनोगत काव्यात व्यक्त केले. संघाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ सह मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थित महिलांचा हार्दिक स्वागत आणि हळदीकुंकू व पंचाअन्न देऊन सर्वाचा मान सन्मान करण्यात आला.
पालकांना आपल्या पाल्याला भविष्यात कसे घडवावे यावर अधिक मार्गदर्शनासाठी लक्ष इन्स्टिट्यूट एज्युकेशन पुणे येथून विनोद कुऱ्हाडे यांनी अप्रतिम असे विचार मंथन केले. या कार्यक्रमाला मध्यान आहाराची व्यवस्था येथील गावकऱ्यांनी केली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णा जयवंत खांडेकर यांनी केले व आभार प्रदर्शन संघाचे उपाध्यक्ष महेश गावडे यांनी केले.