Friday , November 6 2026
Breaking News

हळदी कुंकू व फॅशन शो स्पर्धा उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : मकर संक्रांतीच्या निमित्ताने एंजल फाउंडेशनच्या वतीने महिलांकरिता हळदीकुंकू संक्रांति फॅशन शो कार्यक्रमाचे आयोजन १ फेब्रुवारी २०२४ रोजी जय शंकर भवन येथे करण्यात आले होते.

एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी महिलांना हळदीकुंकू लावून वानचे वाटप करण्यात आले. त्यानंतर महिलांनी पारंपारिक वेशभूषा मध्ये तिळगुळ पासून बनलेल्या दागिने परिधान करून फॅशन शो केला. या स्पर्धेमध्ये एकूण 22 महिलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक दया शिंदे यांनी पटकावले तर द्वितीय पारितोषिक पुष्पा जाधव यांनी पटकावले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ममता आणि सविता यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *