
बेळगाव : संजीवीनी फौंडेशनच्या काळजीकेंद्रात वास्तव्यास असलेल्या रुग्णांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून पुढील तीन दिवस या स्पर्धा चालणार आहेत.
आज सकाळी प्रीती राजू चौगुले यांच्याहस्ते फीत कापून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ, संचालिका रेखा बामणे, सल्लागार सदस्या विद्या सरनोबत आदी उपस्थित होत्या.
यानंतर सावकाश चालणे, लिंबू चमचा आणि अग्निचा वापर न करता विविध पदार्थ बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
उद्या शंभर मीटर धावणे, पोत्यात पाय घालून धावणे, बेडूक उड्या तसेच परवा कॅरम, मेकअप, मेहंदी आणि रांगोळी काढण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
यावेळी बोलताना डॉ. देगीनाळ म्हणाल्या की, रुग्णांना आयुष्यात आनंद मिळावा यासाठी आम्ही वर्षभर विविध उपक्रम आयोजित करीत असतो, यात सारे मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.

Belgaum Varta Belgaum Varta