Friday , November 7 2025
Breaking News

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे दीर्घ आजाराने निधन

Spread the love

 

मुंबई : ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. द्वारकानाथ संझगिरी यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. द्वारकानाथ संझगिरी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. ते लवकरच या आजारातून कमबॅक करत घरी परततील, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र त्यांची प्राणज्योत माळवली. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेक क्रिकेट चाहत्यांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

समालोचक हर्षा भोगले यांची पोस्ट
द्वारकानाथ संझरगिरी यांच्या निधनाचं वृत्त समजताच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रिकेट मराठमोळे समालोचक हर्षा भोगले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. भोगले यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हर्षा भोगले आणि द्वारकानाथ संझगिरी हे गेल्या अनेक दशकांपासूनचे मित्र होते. मात्र आपल्या मित्राच्या निधनानंतर हर्षा भोगले यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांच्याबाबतच्या आठवणी या जगासमोर मांडल्या आहेत.

क्रिकेट आणि सिनेमा
द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर अनेक पुस्तकं लिहिली होती.’ क्रिकेट कॉकटेल’, ‘क्रिकेटर्स मनातले’, अश्रू आणि षटकार, अफलातून अवलिये, फिल्मी कट्टा या आणि अशा अनेक पुस्तकांचं लेखन द्वारकानाथ संझगिरी यांनी केलं होतं. संझगिरी फेसबूकवर सातत्याने क्रिकेट आणि सिनेमा या विषयांवर विस्तृत आणि माहितीपूर्ण लिहायचे. त्यांच्या या लेखाचा एक वाचक आणि चाहतावर्ग होता. मात्र आता त्यांच्या निधनामुळे क्रिकेट आणि सिनेचाहत्यांना या अशा माहितीपूर्ण लेखाला मुकावं लागणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुलाच्या एका ओव्हरमध्ये 5 सिक्स, वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Spread the love  दुबई : श्रीलंकेचा उदयोन्मुख क्रिकेटपटू दुनिथ वेलालागेला मोठा धक्का बसला आहे. दुनिथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *