
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, राज्य मराठी विकास संस्था मुंबई व मराठी विद्यानिकेतन शाळेच्या संयुक्त विद्यमाने सीमा भागातील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘गोष्टरंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना गोष्टींचा आनंद लुटता यावा यासाठी या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक ३ डिसेंबर ते ६ डिसेंबर यादरम्यान मराठी विद्यानिकेतन बेळगाव, बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी व न्यू इंग्लिश स्कूल मुतगे या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये गोष्टरंगचे प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांसाठी पालघर येथील क्वेस्ट या संस्थेतील नाट्यकर्मी विद्यार्थ्यांनी हे प्रयोग सादरीकरण केले… क्वेस्ट म्हणजेच क्वालिटी एज्युकेशन ट्रस्ट ही बालशिक्षण, आदिवासी शिक्षण आणि भाषा संशोधन संस्था पालघर मधील वाडा सोनोळे येथे कार्यरत असून शिक्षण तज्ञ निलेश निमकर हे त्यांचे व्यवस्थापक आहेत… या संस्थेतर्फे गोष्टरंग हा उपक्रम ग्रामीण तसेच मराठी माध्यमाच्या शाळांसाठी घेतला जातो. नृत्य, गाणी, नाटक यांच्या माध्यमातून गोष्टींचे धमाल सादरीकरण केले जाते.. गेले चार दिवस बेळगाव व बेळगाव परिसरामध्ये याचे प्रयोग सुरू आहेत. क्वेस्ट संस्थेचे नाट्यकर्मी सचिन वीर, सायली जोशी, गणेश वसावे हे गोष्टींचे सादरीकरण करत आहेत.. त्याचबरोबर गोष्टी का आणि कशा वाचाव्यात याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व काही गोष्टींची पुस्तके ही भेट दिली. विद्यार्थ्यांना गोष्टीं ऐकण्याची संधी मिळावी यासाठी मराठी विद्यानिकेतनचे पालक व बेळगाव आयकर विभागाचे आयुक्त IRS आकाश चौगुले व गौरी ओऊळकर चौगुले यांनी पुढाकार घेऊन या प्रयोगांचे आयोजन केले… गोष्टरंगच्या एकूण १५ प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले… या उपक्रमाच्या आयोजनासाठी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर यांचे प्रोत्साहन लाभले.. कार्यक्रमाचे व्यवस्थापन इंद्रजीत मोरे, नीला आपटे, नारायण उडकेकर, गजानन सावंत यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta