Wednesday , March 4 2026
Breaking News

पाच राष्ट्रीय महामार्गांचे 28 फेब्रुवारी रोजी भूमिपूजन

Spread the love

बेळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बेळगावला येत आहेत. बेळगाव दौऱ्या दरम्यान नितीन गडकरी बेळगाव विभागातील तीन तर विजापूर विभागातील दोन अशा अशा एकूण 238 किलोमीटर लांबीच्या आणि 3 हजार 972 कोटी रुपये खर्चाच्या पाच राष्ट्रीय रस्ते कामांचा शिलान्यास नितीन गडकरी यांच्या हस्ते केला जाणार आहे.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार मंगला अंगडी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

सोमवारी सुरू होणाऱ्या पाच नव्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंगला अंगडी पुढे म्हणाल्या, बेळगाव ते संकेश्वर 40 किलोमीटर अंतराच्या सहापदरी रस्त्यासाठी 1479.3 कोटी रुपये, संकेश्वर बायपास ते कागल दरम्यानच्या 37 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी 1388.7 कोटी रुपये व सांखळी ते जांबोटी व बेळगाव दरम्यानच्या 69.17 किलोमीटर दुपदरी रस्त्याच्या कामासाठी 246.78 कोटी खर्च केले जाणार आहेत.
याच बरोबर विजापूर विभागातील विजापूर ते मुरकुंडी 766.64 किलोमीटर अंतराच्या दुपदरी रस्त्यासाठी 79.7 कोटी रुपये तसेच सिद्धापूर ते विजापूर 11.62 किलोमीटर अंतराच्या दुपदरी रस्त्यासाठी 90.13 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या पाचही कामांचा शिलान्यास समारंभ सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बेळगावच्या जिल्हा क्रीडांगण कार्य येथे संपन्न होणार आहे, असेही खास.अंगडी यांनी सांगितले. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील तसेच बेळगाव जिल्हा ग्रामीण भाजपाध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *