बेळगाव (वार्ता) : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये आज धर्मध्वजाचे अनावरण सोहळ्यानिमित्त दत्तात्रय मठाचे मठाधिपती अशोकजी शर्मा आणि धनंजय भाई देसाई यांच्या हस्ते पहाटे रुद्राभिषेक पार पडला. त्यानंतर धर्म ध्वजाचा अनावरण सोहळा उत्तरचे आमदार अनिल बेनके, मठाधीश अशोक शर्मा, धनंजय भाई देसाई, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, उपाध्यक्ष सतीश निलजकर यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी देवस्थान समितीचे ट्रस्टी राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, अजित जाधव, अभय लगाडे, राकेश कलघटगी, प्रसाद बाचुळकर, अनिल मुतकेकर, विवेक पाटील, दौलत साळुंखे, हिंदुराष्ट्र सेना बेळगाव जिल्हाप्रमुख रवी कोकितकर, मंदिरातील सेवेकरी दौलत जाधव, कपिल कुरणे, विनायक मणगूतकर आदी सेवेकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन पाटील तर आभार प्रदर्शन दौलत साळुंखे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta