Wednesday , March 4 2026
Breaking News

खाऊ कट्टा प्रकरणाने दोन नगरसेवकांचे पदचं खाल्ले!

Spread the love

 

बेळगाव : बसवेश्वर सर्कल, गोवावेस येथील वादग्रस्त खाऊ कट्टा भ्रष्टाचार प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दोन नगरसेवकांना दोषी मानून दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा आदेश प्रादेशिक आयुक्तांनी बजावला आहे. महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लवकरच होत असताना, आज करण्यात आलेली दोन नगरसेवकांच्या विरोधातील कारवाई बेळगावच्या राजकारणातील एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

बेळगावचे प्रादेशिक आयुक्त संजीवकुमार शेट्टन्नावर यांनी सदर सुनावणी केली असून या प्रकरणी नगरसेवक जयंत जाधव व नगरसेवक मंगेश पवार यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. कर्नाटक महानगरपालिका कायद्यानुसार खाऊ कट्टा येथील गाळे बेकायदेशीर पद्धतीने हडप करण्यात आल्याचे सुनावणीतदरम्यान सिद्ध झाले असून केएमसी ऍक्ट नुसार लाभाचे पद घेता येत नाही, निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर अशी पदे सोडून देणे गरजेचे आहे. मात्र तसे न झाल्याचे आढळून आले असून यासंदर्भातील सर्व दोषारोपपत्र तसेच कागदपत्रांची पडताळणी करून, जबाब नोंदवून प्रादेशिक आयुक्तांनी सदर निर्णय दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *