Sunday , July 26 2026
Breaking News

विनोद गायकवाड यांना स्वातंत्र्यवीर द. का. हसमनीस पुरस्कार प्रदान

Spread the love

 

बेळगांव : येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गायकवाड यांना दिनांक नऊ फेब्रुवारी 2025 रोजी विटा येथील 43 व्या साहित्य संमेलनामध्ये उपरोक्त पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मानपत्र, पाच हजार रुपये, शाल, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस म्हणाले की, योग्य माणसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार तेवढ्याच तोलामोलाच्या साहित्यिकाला लाभतो, हा योग दुर्मिळ आहे !! द. का. हसमनीस यांनी आपल्या लेखनाने कथा, कादंबरी, चित्रपटकथा, चित्रपट अशा विविध कला क्षेत्रात अमोल असे योगदान दिले आहे. डॉ. गायकवाड यांनीही कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा, संशोधन, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. ज्यांची पुस्तके सहा भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत असा या काळातील एकमेव साहित्यिक म्हणजे डॉ. गायकवाड !!
सत्काराला उत्तर देताना गायकवाड म्हणाले, फार मोठ्या व्यक्तीच्या नावाचा हा पुरस्कार माझ्यावरील जबाबदारी वाढवणारा आहे. अत्यंत कृतज्ञतेने मी हा पुरस्कार स्वीकारतो . ग्रामीण साहित्याची एक मोठी पिढी द. का. हसमनीस यांनी घडवली! अनेक नामांकित लेखक त्यांनी घडवले. त्यांच्या नावाचा पुरस्कार हा माझा आजवरचा सर्वोच्च सन्मान आहे. मी द. का. हसमनीस आणि त्यांचे नातू मा. विक्रम हसमनीस यांचा ॠणी आहे!
याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, संमेलनाचे संयोजक रघुनाथ मेटकरी विश्वनाथ गायकवाड, पद्मश्री भाटिया, सौ. ललिता सबनीस, डॉ. ऋषिकेश मेटकरी, प्रा.श्रुती वडगबाळकर असे अनेक ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *