बेळगाव : प्रयागराजला जाणाऱ्या 6 प्रवाशांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. सर्व मृत बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूरमधील खिटौला पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली. वाहन क्रमांक KA-49, M-5054 पहाटे 5 वाजता हा अपघात झाल्याची माहिती आहे. एकूण 8 जणांनी प्रवास केल्याचे सांगण्यात आले, त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आणि दोन गंभीर जखमी झाले आणि त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळल्याने वाहन पलटी होऊन हा अपघात झाला. या अपघातात भालचंद्र गौडा (५०), सुनील शेडश्याळे (४५), बसवराज कुर्ती (६३), बसवराज दोडमल (४९), एरन्ना शेबिनकट्टी (२७), विरुपाक्ष गुमठी (६१) अशी मृतांची नावे आहेत. तर मुस्ताक शिंदीकुरबेट,
सदाशिव उपदली या दोन्ही जखमींना जबलपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बेळगाव जिल्हा पोलिस जबलपूर जिल्हा पोलिसांच्या सतत संपर्कात असल्याचे समजते.
Belgaum Varta Belgaum Varta