बेळगाव : नुकत्यात इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या 50 मीटर जलतरण तलावात घेण्यात आलेल्या गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटुनी उत्कृष्ट कामगिरी करून 16 सुवर्ण 16 रौप्य व 4 कांस्य अशी एकूण 36 पदके संपादन केली. कुमारी निधी मुचंडी व कुमार अद्वैत जोशी यांनी आपल्या गटात वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवली. या स्पर्धेत 250 हून अधिक जलतरणपटूंनी भाग घेतला होता. जलतरणपटूंची कामगिरी पुढील प्रमाणे
मुले – स्मरण मंगळूरकर (खुला गट) तीन रौप्य दोन कांस्य. धवल हनमनावर (गट क्रमांक एक) तीन सुवर्ण, एक रौप्य. अर्णव किल्लेकर (गट क्रमांक तीन) एक रौप्य एक कास्य. अमोघ रामकृष्ण (गट क्रमांक तीन) दोन रौप्य. दक्ष जाधव (गट क्रमांक चार) एक सुवर्ण. अद्वैत जोशी (गट क्रमांक पाच) तीन सुवर्ण एक रौप्य.
मुली. अनन्या रामकृष्ण (गट क्रमांक दोन) एक सुवर्ण, तीन रौप्य. श्रेया जोगमनावर (गट क्रमांक तीन) एक रौप्य. कनक हलगेकर (गट क्रमांक तीन) एक रौप्य. अनिका बरडे (गट क्रमांक तीन) एक रौप्य. निधी मुचंडी (गट क्रमांक चार) पाच सुवर्ण एक रौप्य. अमूल्यl केस्टिकर (गट क्रमांक चार) एक सुवर्ण एक रौप्य. ओवी जाधव (गट क्रमांक चार) एक सुवर्ण. तनवी मुचंडी (गट क्रमांक चार) एक सुवर्ण. अद्विका पाटील (गट क्रमांक 6) एक कांस्य.
वरील सर्व जलतरणपटूना आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे एन आय एस जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभते.
Belgaum Varta Belgaum Varta