Thursday , June 4 2026
Breaking News

महात्मा गांधी संस्थेतर्फे कथा, लेखन मार्गदर्शन शिबिर

Spread the love

 

कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे कथा, लेखन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक २ मार्चला बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी येथे सकाळी १०.३० कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकर चौगले उपस्थित रहाणार आहेत
साहित्य लेखन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणतं कौशल्य विकसित करावे त्याचं मार्गदर्शन तासगावचे साहित्यिक रवि राजमाने करणार आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात मोठं योगदान दिले आहे. हिरवं स्वप्न कथासंग्रह, बालवीरांच्यासाहसी कथा, आरबुज व्यक्तिचित्रण, वाळवाण ही कादंबरी अशी इतर पुस्तके प्रकाशित झाली आहेत गोमंतकीय साहित्य पुरस्कार, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी, बेळगाव वाड्मयमंडळाचा पुरस्कार, असे विविध संस्थाचे पंधराहून अधिक प्राप्त झाले आहेत.
वाळवाण कादंबरी अभ्यासक्रमात मराठवाडा विद्यापीठ एम. ए. साठी समावेश आहे अशा साहित्यिकाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
उद्घाटन प्रा. परसु गावडे, तसेच कवी बसवंत शहापूरकर, शिवाजी शिंदे, प्रा. अशोक अलगुंडे, महादेव खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे
तरी या साहित्यिक उपक्रमाला विद्यार्थी, साहित्यप्रेमीनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन वाय. पी. नाईक, कोमल गावडे, ऍड. नामदेव मोरे, सूरज कणबरकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान

Spread the love  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *