Thursday , March 5 2026
Breaking News

सांबरा येथे एटीएम फोडून लुटीच्या प्रकाराने खळबळ

Spread the love

 

 

बेळगाव : सांबरा येथे चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून मोठी रक्कम लांबविली असल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकूण किती रक्कम चोरीस गेली याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आणखी काही ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशीस प्रारंभ केला आहे. या एटीएम वर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून सीसीटीव्ही निष्क्रिय बनविण्यात आले आहेत. त्यानंतर हा लुटीचा प्रकार करण्यात आला असल्याचे समोर येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *