बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन मंत्र्यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकृत आदेश जारी केला आहे. चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराज देसाई यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
शुक्रवारी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवादासंदर्भात महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा प्रभावीपणे पाठपुरावा करण्यासाठी याचिकेवर सरकारचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नियुक्त केलेले ज्येष्ठ वकील आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यात समन्वय साधण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने 2015 पासून सीमाप्रश्नासाठी समन्वय मंत्र्याची नियुक्ती केली होती.