Tuesday , March 3 2026
Breaking News

स्त्रियांचे सामर्थ्य आणि सृजनशीलता आमच्या विद्यार्थिनींनी सिद्ध केली : डॉ  मनीषा नेसरकर

Spread the love

 

 

बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक महिला दिन असा संयुक्त कार्यक्रम रविवारी साजरा करण्यात आला. वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मनीषा नेसरकर या उपस्थित होत्या. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड, उपाध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड, डॉ. मनीषा नेसरकर आणि सहकार्यवाह अनंत जांगळे उपस्थित होते.
यावेळी मराठी विभागातील पीएचडी पूर्ण केलेल्या आणि करीत असलेल्या विद्यार्थिनींनी आपले अनुभव कथन केले. “स्त्रियांचे सामर्थ्य आणि सृजनशीलता आमच्या विद्यार्थिनींनी सिद्ध केली” असे सांगून डॉ. नेसरकर पुढे म्हणाल्या की, “आमच्या विद्यार्थिनींनी आपल्या बालपणापासून ते पीएचडी पर्यंतचा संघर्ष सांगितला आहे. त्यातून त्यांची एक अनभिज्ञ बाजू समोर आली. पीएचडी पदवी पर्यंतचा प्रवास खडतर असतो पण सर्व सं कटाना तोंड देत त्यांच्या यशाची शिखर गाठणाऱ्या या मुली इतरांना आदर्शवत अशा आहेत आणि त्यांना इथे आणून व्यक्त करण्याचा सार्वजनिक वाचनालयाचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे”
याप्रसंगी प्रियांका भांदुर्गे (कट्टणभावी), सुवर्णा पाटील (किणये), पूजा कांबळे (कारदगा), नेहा पाटील (चोरला), सोनाली कांगले (वडगाव), सुप्रिया जाधव (संकेश्वर), कल्पना रायजाधव (कारदगा), मनीषा पाटील (कलखांब), डॉ. वृषाली कदम (मन्नूर), पूजा डेळेकर (मच्छे), नर्मदा कुराडे (चिकोडी), डॉ. शोभा पाटील (निपाणी) आदिनी आपले पीएचडी बाबतचे अनुभव कथन केले. या सर्व विद्यार्थिनींचा सत्कार पुष्प गुच्छ आणि वाचनालयाचे स्मृतिचिन्ह देऊन अध्यक्ष व संचालकांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करून श्री. अनंत लाड यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. आभार प्रदर्शन संचालक रघुनाथ बांडगी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. विनोद गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाला एम ए आणि पीएचडीच्या विद्यार्थीनी, त्यांचे नातेवाईक, वाचनालयाचे संचालक, कर्मचारी आणि श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *