बेळगाव : कावळेवाडी येथील भजनी मंडळ, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, ग्रामस्थ मंडळच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 16 मार्चला तुकाराम बीज पासून सुरू होणार आहे. सलग हे सव्वीस वर्षे अखंडपणे माळकरी मंडळी हा अध्यात्मिक सोहळा आयोजित करतात.
यावेळी वारकरी मंडळातर्फे मूहूर्तमेढ कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे प्रमुख वाय. पी. नाईक उपस्थित होते. मूहूर्तमेढ पूजन प्रा. पी. व्ही. नाकाडी व आनंद धामणेकर यांच्या हस्ते करण्यात आले
याप्रसंगी सौ.गगुंबाई य.मोरे, आशा अ.बाचीकर, यल्लुबाई ल.जाधव, रेणुका रा जाधव, राणी मा मोरे या महिलांचा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
गावातून भजनी मंडळींनी मूहूर्तमेढ वाजत गाजत टाळमुर्दगांच्या गजरात अभंग म्हणत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वाय. पी. नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना संत महिमा मोठा आहे.संताची शिकवण समाजाला दिशा देणारी आहे मनाला सुख, शांती समाधान अध्यात्मिक विचारातून मिळते. संतसाहित्य भौतिक तेच्या पलीकडे जाऊन नितीमत्ता शिकवते. दरवर्षी वारी करणारे, गळ्यात तुळशीची माळ घालून हरिपाठ कीर्तन प्रवचन ऐकणारे श्रेष्ठ आहेत एकादशी व्रत केल्याने अहंभाव निघून जाते या साठीच पारायण सोहळा आयोजित केला जातो असे मौलिक विचार व्यक्त केले.
यावेळी प्रा. पी. व्ही. नाकाडी, यशवंतराव मोरे, हभप शिवाजी जाधव, मारुती बाचीकर, यांनी विचार मांडले.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे श्रीफळ, गुलाब पुष्प, पान विडा देऊन स्वागत केले.
यामुळे जोतिबा मोरे, संजय ओऊळकर, चुडापा यळुरकर, युवराज नाईक, लक्ष्मण जाधव, मारुती मोरे, महादेव बडसकर, रघुनाथ मोरे, भरमाणा मोरे, रामू गुरव, मारुती कार्वेकर, चंद्रकांत बाचीकर, शंकर सांबरेकर, तुकाराम प. मोरे, गोपाळ जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन हभप शिवाजी जाधव, आभार मारुती बाचीकर यांनी मानले. पी. एम. पन्हाळकर, पी. व्ही. नाकाडी, वाय. पी. नाईक यांनी आर्थिक सहकार्य केले.
Belgaum Varta Belgaum Varta