Saturday , June 14 2025
Breaking News

12 वर्षांचा दुष्काळ संपवला, टीम इंडिया ‘चॅम्पियन्स’!

Spread the love

 

दुबई : हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यानंतर आता रविवार 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, कर्णधार रोहित शर्माच्या दमदार खेळीच्या बळावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 9 महिन्यांत दुसरी ट्रॉफी जिंकली आहे. 2024 चा टी-20 व जिंकल्यानंतर, रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 12 वर्षांनी पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. यासह, टीम इंडियाने 25 वर्षांपूर्वी याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेतला. यासोबतच त्याने ही ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रमही केला.

सुमारे 9 महिन्यांपूर्वी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता आणि वर्षानुवर्षे सुरू असलेला दुष्काळ संपवला होता. त्या विजयाने केवळ प्रतीक्षा संपवली नाही तर टीम इंडियाची भूकही वाढवली. आणि रोहितच्या संघाने पुन्हा एकदा एकही सामना न गमावता जेतेपद जिंकले.

अंतिम सामन्यात कर्णधार रोहितला गवसला सूर

संपूर्ण स्पर्धेत रोहितच्या बॅटमधून एकही मोठी खेळी झाली नव्हती आणि अंतिम सामन्यांमध्ये तो अर्धशतकही करू शकला नाही. त्याच वेळी, त्याच्या निवृत्तीबद्दल अटकळ सुरूच होती. रोहित शर्माने संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आपल्या आक्रमक शैलीने न्यूझीलंडला सुरुवातीपासूनच बॅकफूटवर आणले. रोहितने जलद अर्धशतक झळकावले आणि नंतर शुभमन गिलसोबत शतकी भागीदारी केली. टीम इंडियाला येथे दोन झटपट धक्के बसले आणि शुभमन गिलनंतर विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला. लवकरच कर्णधार रोहितनेही आपली विकेट गमावली. येथून, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी 61 धावांची भागीदारी करून संघाला पुनरागमन करून दिले. श्रेयसचे अर्धशतक हुकले आणि त्यानंतर अक्षर पटेलही काही वेळातच पॅव्हेलियनमध्ये परतला. पण केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने संघाला विजयाच्या खूप जवळ आणले. हार्दिक विजयापूर्वीच बाद झाला होता पण राहुलने रवींद्र जडेजासह संघाला जेतेपद जिंकल्यानंतरच सुटकेचा नि:श्वास सोडला.

त्याआधी टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणाऱ्या किवींनी रवींद्रच्या चौफेर टोलेबाजीमुळे 10 षटकांत एक बाद 69 अशी वेगवान सुरुवात केली होती. भारतीय फिरकीने मग किवींच्या आक्रमक बॅटिंगला ब्रेक लावला. रचिन रवींद्रने 29 चेंडूत 37 धावांची जलद खेळी केली. केन विल्यमसन फक्त 11 धावा काढून बाद झाला, परंतु डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यातील 57 धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडला सामन्यात परत येण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. मिशेलने 63 धावा आणि फिलिप्सने 34 धावा केल्या. शेवटी, मायकेल ब्रेसवेलने नाबाद 53 धावा करत न्यूझीलंडला 251 धावांपर्यंत पोहोचवले.

शेवटच्या 10 षटकांत मायकेल ब्रेसवेलचा तडाखा

40 षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडने 5 गडी गमावून 172 धावा केल्या होत्या. येथून, पुढील 10 षटकांत, न्यूझीलंडने फक्त 2 विकेट गमावल्या आणि एकूण 79 धावा केल्या. विशेषतः मायकेल ब्रेसवेलची 53 धावांची खेळी टीम इंडियासाठी अभ्यासक्रमाबाहेरची होती. त्याने 40 चेंडूत 53 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. एकेकाळी असे वाटत होते की न्यूझीलंड जास्तीत जास्त 230 धावा करू शकेल. पण ब्रेसवेलच्या खेळीमुळे न्यूझीलंडला 250 धावांचा टप्पा ओलांडता आला.चक्रवर्तीने सामन्यात यंग आणि ग्लेन फिलिप्सला आऊट करून 2 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवनेही 2 विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाने लॅथमला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वेगवान गोलंदाजांमध्ये शमीने 1 बळी घेतला, पण शमी महागडा गोलंदाज ठरला त्याने 9 षटकात 74 धावा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

‘किंग कोहली’ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती!

Spread the love  मुंबई : भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटून विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *