Tuesday , March 3 2026
Breaking News

वैदिक विज्ञान पुस्तकाचे दिव्य प्रकाशन

Spread the love

 

बेळगाव : पुणे येथील पुणे विद्यापीठाचे धातूशात्र अभियांत्रिक विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. मोहन केशव फडके (वैदिक शास्त्र, तंत्र, मंत्र, यंत्र विशारद) लिखित रोगमुक्तीसाठी वैदीक विज्ञान या मराठी एव कन्नडा पुस्तकाचे प्रकाशन केएल‌एस आएएमइआर (Imer) हिंदवाडी बेळगांव सभागृहात संपन्न झाले. वैदीक विज्ञान पुस्तकाचे लेखक डॉ. मोहन केशव फडके, सौ.मंगला फडके, माजी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर आनंद चव्हाण, श्री. जगदीश हंपन्नावर (उद्योगपती सौंदत्ती), मारुती डी पाटील (अध्यक्ष बेळगांव मित्र परिवार पुणे), अजित पाटील (व्यवसायिक पुणे) यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात द्विपप्रज्वलन व प.पु स्वामी गगनगिरी महाराज एव प.पू कै. पोंक्षे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. विठ्ठल कोले यांनी केली. सुरूवातीस मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पुस्तकाविषयी बोलताना डॉ. मोहन फडके यांनी मंत्र, तंत्र, यंत्र तसेच विविध आचार विचार, स्तोत्रे कवने यामागील विज्ञान आधुनिक ज्ञात विज्ञानानुसार काय आहे हे सद्य स्थितीत तरुण चिकित्सक पीढीला समजणे फार जरूरीचे आहे. यासाठी वैदिक विज्ञान व‌आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून ते शास्त्र समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. रोग व व्याधी मुक्त आयुष्य जगण्यासाठी हे वैदिक विज्ञान पुस्तक समाजासाठी खुप उपयुक्त आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून हि एक मानवसेवा आहे असे त्यांनी सांगितले. या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी श्री. विनोद नलवडे, श्री. मनोहर सोमनाचे, श्री. विठ्ठल कोले तसेच श्री. एम डी पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ. ज्योती नलवडे, सौ. गिरिजा सोमनाचे, मयुरी कचारिया, दत्तात्रय जाधव, सौ. प्रतिभा जाधव, चंद्रकांत केदार, चंद्रकांत कणुकले, शांताराम पिंजन, संजय जोशी, विजय वाडेकर यांनी हातभार लावला.

कार्यक्रमाचे कन्नड भाषेतून सुत्रसंचलन सौ.सुप्रिया देशपांडे व मराठी सुत्रसंचलन आणि आभार सौ.रोशनी रविराज हुंद्रे यांनी केले. वैदीक विज्ञान पुस्तक उपलब्ध होण्यासाठी या ध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ७५५८५६०४९५ ,९०२८२७६२८६.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *