Wednesday , December 17 2025
Breaking News

रंगांची उधळण करताना सावधान; अन्यथा कायदेशीर कारवाई

Spread the love

 

 

बेळगाव : होळी आणि धुलिवंदन उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मार्केट पोलिसांकडून हा उत्सव शांततेत साजरा केला जावा यासाठी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. विनाकारण अनेकजण पादचाऱ्यांवर, महिलांवर रंगांची उधळण करत असतात. संबंधितांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास रंग उधळणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मार्केटचे पोलिस निरीक्षक एम. के. धामनवर यांनी नुकतेच झालेल्या शांतता बैठकीत सांगितले

होळी रंगपंचमी निमित्त मार्केट पोलीस स्थानकात सोमवारी सायंकाळी सात वाजता मार्केटचे पोलिस निरीक्षक एम. के. धामनवर यांच्या नेतृत्वाखाली शांतता कमिटीची बैठक बोलविण्यात आली होती बैठकीचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल यांनी सरकारचे नियम वाचून होळी शांततेत करण्याचे आव्हान केले

सुनील जाधव यांनी बोलताना म्हणाले पारंपरिक प्रमाणे रंगपंचमी यावर्षी उत्साहात साजरी होईल उत्सव साजरा करताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजेत सरकारी नोकर किंवा विद्यार्थ्यावर कोणी रंग घालू नये. संवेदनशील भागातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही व बॅरिकेडची कडक उपाययोजना राबवल्या जाव्यात तसेच. पारंपरिक प्रमाणे चव्हाट गल्लीत जत्रा करून होळी सण साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विजय जाधव यांनी होळी आणि रमजान सण शांततापूर्ण आणि सुसंवादीपणे साजरे करण्यासाठी पोलिस दल आणि शांतता समिती सदस्यांची संयुक्त जबाबदारी अधोरेखित केली. या महत्त्वाच्या प्रसंगी प्रेम आणि सद्भावनेचे वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. “यावेळी, आपल्याला एकत्रितपणे शांततेवर विश्वास ठेवण्याची संधी आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण आपली भूमिका अत्यंत समर्पणाने पार पाडूया,” असे आवाहन त्यांनी केले.

तसेच वाहतुक पोलिसांकडूनही होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी मुख्य मार्ग, आणि चौकांत वाहन चालकांना आवर घालण्यासाठी युवकांना हकनाक त्रास होऊ नये यांची तपासणी केली जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी तशी योग्य सूचना देण्यात यावी.

यावेळी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकतील अशा दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या बातम्या फॉरवर्ड करण्यापासून तरुणांना दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये अधिकारी तैनात करून, संवेदनशील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही व बॅरिकेडची कडक उपाययोजना राबवल्या जातील. जबाबदार सोशल मीडियाच्या वापरावर भर देत, त्यांनी असत्यापित माहिती पसरवण्याविरुद्ध इशारा दिला.

यावेळी उपस्थित नगरसेवक शिवाजी मंडोळकर, विजय जाधव, सचिन कंणबरकर, रोहित रावळ, अजित कोकणे, प्रताप मोहिते, संजय नाईक, विकी कल्पत्री, विश्वजीत हसबे यासह अन्य शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव कृषी खात्याच्या अधिकाऱ्यावर लोकायुक्त पोलिसांचे छापे

Spread the love  बेळगाव : कृषी खात्याचे बेळगाव जिल्हा दक्षता दलाचे सहसंचालक राजशेखर इराप्पा बिजापूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *