Monday , September 21 2026
Breaking News

श्री मळेकरणी देवीच्या परिसरात होणार वार्षिक उत्सव; सामंजस्याने तोडगा

Spread the love

 

बेळगाव : गेली १०५ वर्षे उचगाव येथे होळी पौर्णिमेनिमित्त पाच दिवसांचा श्री मळेकरणी देवी सप्ताह साजरा केला जातो. मात्र यंदा हा उत्सव थांबवण्याचा निर्णय देसाई बंधू कमिटीने घेतला होता. त्यांनी देवीच्या जागेवर आपला हक्क सांगत ग्रामपंचायत अध्यक्ष मथुरा तेरसे आणि ग्रामस्थांवर बेळगाव न्यायालयात याचिका दाखल केली होती. निर्माण झालेला वाद अखेर परस्पर सामंजस्याने मिटवण्यात आला आहे. यासंदर्भात वादी आणि प्रतिवादी पक्षांनी संयुक्त निवेदन सादर केले असून, सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने १०५ वर्षांची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

उचगाव गावातील पालखी उत्सवाबाबत वाद निर्माण झाला होता. मात्र, वादी आणि प्रतिवादी यांनी परस्पर सहमतीने हा वाद मिटवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदन सादर केले असून, त्यानुसार वादींना पालखी उत्सवातील पूजेप्रमाणेच इतर धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

उचगाव पालखी उत्सव वादाचा सामंजस्याने निकाल जाहीर करण्यात आला असून दि. १३ मार्च २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणाऱ्या पालखी उत्सवात वादी आणि सर्व ग्रामस्थ एकत्र सहभागी होतील. तसेच, गेल्या १०५ वर्षांची ही परंपरा एकीच्या भावनेने पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *