Sunday , July 26 2026
Breaking News

गर्भाशयाचे लवकर निदान आणि उपचार गरजेचे : डॉ. सुरेखा पोटे

Spread the love

 

संजीवीनी महिला आरोग्य जागृती मास कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन

बेळगाव : गर्भाशयाचे लवकर निदान आणि उपचार केल्याने पुढील परिस्थितीची प्रगती टाळता येते आणि लक्षणे कमी होतात त्यासाठी डॉक्टरांचा वेळेत सल्ला घेणे महत्त्वाचे असल्याचे मत डॉ. सुरेखा पोटे यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संजीवीनी फौंडेशनच्या वतीने आयोजित महिला आरोग्य जागृती मास कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ, संचालिका रेखा बामणे सल्लागार सदस्या डॉ. नविना शेट्टीगार, प्रीती चौगुले, विद्या सरनोबत उपस्थित होत्या.
अनेक स्त्रियांना गर्भाशयाच्या विविध विकारांना तोंड द्यावे लागत असताना शेजारिण किंवा मैत्रिणीने गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतर त्रास कमी झाला मग माझी पण पिशवी काढुन घेऊन त्रासातून मुक्त व्हावे असे वाटत असते पण प्रत्येक स्त्रीचा आजार हा वेगळा असू शकतो त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा असतो आणि तोही वेळेत घ्यावयाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर गर्भाशय काढल्यानंतर कोणकोणती काळजी घ्यावी याचेही विस्तृतपणे विवेचन केले.
तत्पूर्वी स्वागत आणि प्रास्ताविक करीत असताना डॉ. देगीनाळ यांनी प्रत्येक स्त्री ही आपल्या कुटुंबाची काळजी करीत असताना स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करीत असते त्यासाठीच आम्ही संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून आरोग्य जागृती मास पाळण्यात येत असून आठ मार्च ते आठ एप्रिल या संपूर्ण महिन्यात चार ठिकाणी स्त्रियांचे आरोग्य या विषयावर वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांची मार्गदर्शन शिबिरे आयोजित करीत असल्याचे सांगितले.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून उदघाटन करण्यात आले.
यावेळी महानगरपालिकेच्या महिला स्वच्छता कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. यावेळी महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता सिद्दी यांनी तर आभार पुष्पा भेंडवाड यांनी मांडले.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *