बेळगाव : बेळगुंदी येथील कलमेश्वर युवक व्यायाम मंडळाच्यावतीने एका बैलजोडीने गाडी ओढण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक 3 रोजी दुपारी बारा वाजता शर्यतीचे उद्घाटन होणार आहे. या शर्यत उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर राहणार आहेत. गाडा पूजन माजी महापौर शिवाजी सुंठकर व चंदगड तालुक्याचे नेते, माथाडी कामगारांचे नेते शिवाजी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. मोठ्या गाड्याचे उद्घाटन कल्लाप्पा पालकर व लहान गाड्याचे उद्घाटन डॉक्टर नितीन राजगोळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आर. आर. पाटील तर कलमेश्वर प्रतिमेचे पूजन मार्कंडेय साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दीप प्रज्वलन तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, समितीचे नेते म्हात्रु झंगरुचे, लक्ष्मण होनगेकर, सुनील अष्टेकर, आर. के. पाटील, विजय कडुकर यांच्या हस्ते होणार आहे. ही शर्यत दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मोठ्या गटांमध्ये प्रथम क्रमांकासाठी 51 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 41 हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी 31 हजार रुपये, अशी आकर्षक पंधरा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. लहान गटामध्ये एक बैल बिन दाती व एक बैल दोन जाती असणार आहे. या गटासाठी प्रथम क्रमांकासाठी बारा हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी आठ हजार रुपये, अशी एकूण दहा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी या शर्यतीचा हौशी बैलजोडी मालकाने लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
Check Also
मराठी विद्यानिकेतन स्नेहसंमेलन कार्यक्रमांमध्ये ऐनवेळी बदल
Spread the love बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेचे स्नेहसंमेलन 27 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी …