बेळगाव : काँग्रेसच्या एका नगरसेवकाकडून महापालिका अधिकाऱ्याचा सतत छळ होत असून नगरसेवकाने अधिकाऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप करीत बेळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून मूक निदर्शन केली.
बेळगाव महानगरपालिकेचा तो नगरसेवक अधिकाऱ्यांबरोबर बोलताना अर्वाच्च शब्दांचा वापर करतो. शिवाय मानसिक छळ करून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या देतो. याचा गांभीर्याने विचार व्हावा आणि. महानगरपालिका अधिकाऱ्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज बेळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याण विकास संघटनेने महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून मूक निदर्शने केली. नगरसेवक रियाज किल्लेदार हे महानगरपालिकेचे महसूल अधिकारी संतोष हनिशेट्टर आणि आणि इतर अधिकाऱ्यांबद्दल अपशब्द वापरत आहे आणि त्यांच्या जीवे मारण्याची धमकी देत आहे. यामुळे अधिकाऱ्यांकडून संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेचे आणखीन एक अधिकारी मलीक गुंडप्पनवर यांच्याकडूनही कनिष्ठ अधिकाऱ्यांना दररोज त्रास होतो. यासंदर्भात महापौर व उपमहापौरांना निवेदन दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अधिकाऱ्यांना आपले नित्य काम करण्यासाठी मुक्त आणि सदृढ वातावरण मिळावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta