Tuesday , March 3 2026
Breaking News

कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी

Spread the love

बेळगाव : आज महाशिवरात्री निमित्त बेळगावमधील दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
कपिलेश्वर मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. बेळगांववासीयांचे आराध्य दैवत असलेले श्री कपिलेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान मानले जाते.
हिंदू धर्मशास्त्रामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. शिवपौराणिक कथेनुसार महाशिवरात्री हा एक पवित्र सण आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी दिवशी हा सण साजरा केला जातो. आजच्या दिवशी शिवभक्त शिवालयामध्ये जलस्नान करतात. प्रचिन पौराणिक कथेनुसार महाशिवरात्री हा शिवशक्तीच्या मिलनाचा सण आहे, असे मानले जाते की आजच्या रात्री अध्यात्मिक शक्ती जागृत होतात.
शहरातील कपिलेश्वर मंदिरात त्रिफळा लावून महारुद्राची विशेष शिवपूजा करण्यात आली. माध्यरात्रीपासूनच मंदिरामध्ये विशेष धार्मिक पूजा करण्यात आली. विद्युत रोषणाईने मंदिराची सजावट लक्षवेधी ठरत आहे. बेळगांवसह उपनगरातील हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून भगवान शंकराचे दर्शन घेतले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *