
कावळेवाडी… दरवर्षी प्रमाणे यंदाही तुकाराम बीजचे औचित्य साधून सलगपणे २६ वर्षे कावळेवाडी गावात उद्या रविवारी पासून पहाटे पासून सुरू होत आहे. अधिष्ठान हभप मारुती म.पाटील, उप अधिष्ठान हभप शिवाजी जाधव.
१५ मार्चला गावातून संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
दिनांक ९ मार्चला वाचनालयाचे अध्यक्ष वाय पी नाईक यांच्या हस्ते मूहूर्तमेढ सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रा पी व्ही नाकाडी, आनंद धामणेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले
रविवार १६ रोजी प्रवचन हभप लक्ष्मण चोपडे महाराज, किर्तन हभप यल्लापा पाटील महाराज यांचे होईल.
दि. १७ रोजी प्रवचन हभप मारुती पाटील मंडोळी, किर्तन हभप डॉ शिवाजीराव पन्हाळे यांचं आहे. तर सायंकाळी दीपोत्सव कार्यक्रम मोहनराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. दीपोत्सव मानकरी शरद पाटील व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.
१८ मार्चला कालाकिर्तन होऊन महाप्रसादाने सांगता होईल
महाप्रसादाचे मानकरी डॉ. भूपाल अलकनूर, तसेच महात्मा गांधी वाचनालय कडून ₹५००१/-व इतर मान्यवरांच्या आर्थिक सहकार्यातून आहे, तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पारायण मंडळ ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta