बेळगाव : शाहूनगर येथील एस एस क्लासेस मध्ये नियमित प्रवेश घेणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समर व्हेकेशनचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मर्यादित जागा असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन एस एस क्लासेस व्यवस्थापनाने केले आहे.
कोरोनापूर्वी सुरू असलेल्या एस एस क्लासेसने पुन्हा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन क्लासेसची सुरुवात केली आहे. जे विद्यार्थी यंदा दहावीला जाणार आहेत त्यांच्यासाठी येथे नियमित क्लासेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियमित प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस एस क्लासेसने अनोखी संधी उपलब्ध करून दिली असून त्यांच्यासाठी दोन महिने मोफत समर व्हेकेशनचे आयोजन केले आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विद्यार्थ्यांना या समर व्हेकेशनचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. ज्या विद्यार्थ्यांचा कन्नड विषय कच्चा आहे, अशा पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एप्रिल व मे महिन्यात विशेष कन्नड क्लासेसचेही येथे आयोजन करण्यात आले आहे. उत्तम आसन व्यवस्था, पुरेसा प्रकाश आणि नैसर्गिक वातावरणात विद्यार्थ्यांना उन्हाळ्यातील शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. इच्छुक विद्यार्थी व पालकांनी शाहूनगर येथील एमजी रोडवरील एस एस क्लासेस येथे संपर्क साधावा, ( क्र. 8050764284 अथवा 9900612462) असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.