बेळगाव : बुधवार दिनांक 19 मार्च 2025 रोजी शहापूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कैलासवासी नारायण गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने यावर्षीही रंगपंचमी दिवशी फुलांची उधळण करून रंगपंचमी खेळण्यात येणार आहे. शहापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नवी गल्ली गाडेमार्ग शहापूर येथे सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास बेळगाव आणि शहापूर येथील मान्यवर व्यक्ती आणि शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी हजर राहणार आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे अशी विनंती नारायण गुंडोजी जाधव ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.