Tuesday , December 16 2025
Breaking News

मुडलगी येथील यड्रावी कुटुंबीयांची फिर्याद दाखल : जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिली माहिती

Spread the love

 

बेळगाव : आमच्या दोन एकर जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे या संदर्भात न्याय मागितला असता पोलिसांनीही आमच्याकडे पाठ फिरवली आहे. उलट आमच्यावर दडपण आणण्यात येत आहे. पोलिसांनी आम्हाला न्याय दिलेला नाही. यासाठी आम्हाला आत्महत्या करण्यासाठी दया मारण्याची अनुमती द्यावी अशी लेखी विनंती मुडलगी येथील यड्रावी कुटुंबीयांनी केली असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले आहे.
मंगळवारी बेळगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले, पोलीस आमच्यावर दडपण आणून आमच्यावर अन्याय करीत आहेत, असे यड्रावी कुटुंबीयांनी म्हटले आहे. मुडलगी येथील यड्रावी कुटुंबीयांची फिर्याद आम्ही दाखल करून घेतली आहे. यड्रावी यांची दोन एकर जागा आहे हे खरे. त्यापैकी चार गुंठे जागेवर मंदिर उभारण्यात आल्याचेही खरे आहे. आता जमिनीचा सर्वे होणे आवश्यक असून त्यानंतरच पूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे असे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले. प्रकरणात, काही तरुणांनी महिलांशी असभ्य वर्तन केल्याचे पुरावे आहेत. आरोपीला लवकरच न्यायालयीन कोठडीत पाठवले जाईल, असेही डॉ. भीमाप्पा गुळेद यांनी सांगितले आहे.

About Belgaum Varta

Check Also

समाज सारथी सेवा संघाची येळ्ळूरमध्ये स्थापना

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर मधील समान विचार आणि ध्येय असलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *