बेळगाव : अजय चेस अकॅडमी यांच्यावतीने आयोजित दोन दिवशीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत चेकमेट स्कूल ऑफ चेस या बुद्धीबळ प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
दिनांक 26 व 27 फेब्रुवारी अशा दोन दिवस घेण्यात आलेल्या या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात रईस अहमद खान या बुद्धिबळपटूने दुसरा क्रमांक पटकावून चषक आणि दोन हजार रुपये रोख बक्षीस मिळविले. श्रीकरा दर्भाने चौथा क्रमांक पटकावून पदक आणि एक हजार रुपये रोख रकमेचे बक्षीस तर साहिल भट या बुद्धिबळपटूने पाचवा क्रमांक घेऊन पदक आणि सातशे रुपये रोख रकमेचे बक्षीस मिळविले.
इयत्ता पहिली ते इयत्ता चौथी गटात अद्वय मन्नोळकर हा या गटाचा चॅम्पियन ठरला. या गटात वरूण साठे या बुद्धिबळपटूने चौथा क्रमांक मिळविला. इयत्ता पाचवी ते सातवी या गटात आर्या बुरसे हिने सातवा क्रमांक तर शिव चित्त याने आठवा क्रमांक पटकाविला.
आठवी ते दहावी या गटात प्रणव आनंदाचे याने चौथा क्रमांक तर निखिल कापसे याने दहावा क्रमांक पटकाविला. याच गटात तीन बुद्धिबळपटूंनी टॉप फाईव्हमध्ये आपली वर्णी लावली.
या स्पर्धेत घवघवीत यश मिळविलेल्या चेकमेट स्कूल ऑफ चेस या संस्थेच्या या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक गिरीश बाचीकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.