Sunday , July 13 2025
Breaking News

शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे मराठी भाषा दिन व सेवानिवृती समारंभ संपन्न

Spread the love

बेळगाव : चव्हाट गल्ली बेळगाव येथील मराठी शाळा नं. 5 येथे मराठी भाषा दिन व सेवानिवृती समारंभ असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. शिवराज पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. दिपक किल्लेकर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक भाषणात श्री. व्ही. व्ही. पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्देश सांगून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर मराठी भाषा दिननिमित्त शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेतील विजेते कुमारी तनुजा वड्ड, पूनम रजपूत, संस्कृती हुदलीकर व संस्कृती लोंढे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देवुन गौरवण्यात.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. आर. कडोलकर व सहशिक्षीका श्रीमती एल. आर. गवळी आपल्या प्रदीर्घ सेवेतून आज निवृत झाले त्यानिमीत्त शाळेच्या वतीने, क्लस्टरच्या वतीने तसेच माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ, ग्रंथ व भेटवस्तू देवुन त्यांना सदिच्छा देण्यात आल्या. यावेळी आर. एस. मोरे, श्री. कडोलकर, श्री. दिपक किल्लेकर, श्रीमती गवळी व व्ही. ए. हसबे यांनी आपल्या मनोगतामधून मराठी भाषेचा समृद्ध इतिहास सांगून मराठी भाषेच्या अभिवृदीसाठी आपण सर्वानी एकजुटीने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे नमुद केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये श्री. शिवराज पाटील यांनी मराठी भाषेचा गोडवा गात उपस्थित पालकवर्गाला, मुलाना मराठी भाषेतून शिक्षण देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत पोवार यांनी केले तर आभार श्री. राजू कांबळे यांनी मानले.

कार्यक्रमास एस.डी.एम.सी.चे अध्यक्ष श्री. अशोक अष्टेकर, इतर सदस्य, श्री. रवी नाईक, डॉ. चंद्रकांत बेळगांवकर निवृत्त सुभेदार, व्ही. ए. हसबे मुख्याध्यापक सेंट्रल हायस्कूल, सर्व शिक्षकवृंद, प्रशिक्षणार्थी शिक्षिका, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कन्नड सक्तीच्या फतव्याविरोधात युवा समिती सीमाभागची बैठक

Spread the love  सीमाभागातल्या मराठी बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार बेळगाव : म. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *