बेळगाव : कावळेवाडी गावातील राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष वाय. पी. नाईक यांना नुकताच सावंतवाडी येथे कोकण महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाईक यांना गुरुगौरव पुरस्कार मान्यवर उपस्थित प्रदान करण्यात आला.
वाय. पी. नाईक हे सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत आहेत, अभ्यासपूर्ण व त्यागमय वृत्तीतून कार्याचा आदर्शवत ठसा उमटवला आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी चालवलेले सामाजिक कार्य समाजाला दिशा दर्शक व दीपस्तंभ ठरत आहे. बेळगाव सीमाभागातही त्यांचे कार्य खूपच उल्लेखनीय आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कोकणचे पहिलं वृत्तपत्र दैनिक कोकणसाद व सिंधुदुर्ग लाईव्हच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त औचित्य साधून सावंतवाडी जिमखाना मैदानावर झालेल्या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, अच्युत गोडबोले, सुब्रमण्यम केळकर, आम. दीपकभाई केसरकर, आम.वैभव नाईक, आम. नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, संदेश पारकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सौ. अरचना घारेपरब, राजाराम परब, शेखर अहिरे तसेच विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मार्ट लिडर व गुरु गौरव पुरस्काराने कोकण पुत्रांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सारेगमप लिटिल चॅम्पस विजेती गौरी गोसावी हिचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. दोनसत्रात विधायक उपक्रम झाले.
प्रास्ताविक संपादक-सागर चव्हाण यांनी, सूत्रसंचालन.. जुईली पांगम, देवयानी वरसकर, आभार प्रदर्शन रुपेश पाटील यांनी मानले.
Check Also
सौंदत्ती यल्लमा डोंगरावर येळ्ळूरच्या भाविकांच्या वतीने सामूहिक परड्या भरण्याचा कार्यक्रम
Spread the love येळ्ळूर : परंपरेनुसार शांकभरी पौर्णिमेला प्रतिवर्षी येळ्ळूरच्या भाविकाकडून सौंदत्ती यल्लमा डोंगरावर सामूहिक …