बेळगाव : सरकारी आदर्श मराठी मुलींची शाळा नंबर 5 वडगाव येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. महादेव इब्रामपूरकर यांनी भूषविले. तर प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक श्री. नितीन बेनके यांनी केले. यावर्षीची आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु. साक्षी चंदगडकर हिला प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शनामध्ये पारितोषिक पटकवलेल्या विद्यार्थिनींना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका दीपा देसूरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैशाली पाटील यांनी केले.