बेळगाव : कन्नडधार्जिण्या पीडीओला जाब विचारणाऱ्या किणयेतील (ता. बेळगाव) मराठी तरुणाचा सत्कार केला व सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या प्रकरणी म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवुन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांना सोमवारी माळमारुती पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
बेळगाव पोलिसांनी मिरज मधून शेळके यांना ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर सोमवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केल्यानंतर कारागृहात रवानगी करण्यात आली.