Tuesday , March 3 2026
Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात अडकविलेल्या तिघांना अटक

Spread the love

बेळगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका नराधमाने 21 वर्षीय युवतीला वेश्या व्यवसायाकडे वळवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तिघा आरोपींना कॅम्प महिला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. समाजसेविका माधुरी जाधव, शिवकन्या पाटील, प्रमोदा हजारे यांच्या माहितीनुसार महिला पोलीस पोलीस इन्स्पेक्टर श्रीदेवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एस आय एम. बी. कुरुवत्तीमठ, एस. ए. डुग, हेड कॉन्स्टेबल एस. एफ. तलवार, महिला पोलीस एस सी गुडी, बी बी सोनंद यांनी ही कारवाई केली आहे. अनगोळ येथील येथे आरोपींना रंगेहात पकडून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 3,4,5, आय टी पी कलम या आरोपींवर लागू करण्यात आले आहेत. यावरील पुढील चौकशी न्यायालयात होणार आहे. आरोपी विराप्पा रुद्राप्पा हुंनीवरद, राहणार नागनुर बैलहोंगल सध्या अनगोळ,  मारुती कृष्णा बुवाजी, राहणार लोकळी लक्ष्मी नगर अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी, या युतीला लग्नाचे आमिष दाखवून रिक्षा चालवणाऱ्या एका मुलाने आपले कर्ज फेडण्यासाठी म्हणून या मुलीचा दुरुपयोग करून घेतला आहे. अशी बातमी समाजसेविका माधुरी जाधव, शिवकन्या पाटील, प्रमोद हजारे यांना समजताच महिला पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आणि चाललेल्या प्रकाराची पोलिस ठाण्याला सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस इन्स्पेक्टर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तुकडीने सापळा रचून ही कारवाई केली आहे. अशा या निरपराध मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणे गरजेचे आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *