Sunday , September 8 2024
Breaking News

राजीव टोपन्नावर यांचा आपमध्ये प्रवेश

Spread the love

बेळगाव : पूर्वी कन्नड संघटनांचे नेते असलेले, केजेपीमधून राजकीय क्षेत्रात उडी घेतलेले आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले राजीव टोपन्नावर यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला.
राजीव टोपन्नावर यांनी आज पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बेंगळूरच्या आम आदमी कार्यालयात आम आदमी पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.
राजीव टोपन्नावर पक्ष बदलामुळे बेळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी असताना जिल्ह्यात हाय व्होल्टेजचं राजकारण सुरू झालं आहे.
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खूप मोठा चाहता होतो. ज्यांनी चांगले प्रकल्पही राबवले पण स्थानिक नेते हे प्रकल्प योग्य प्रकारे राबवत नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या क्रांतीने समाजात चांगले वातावरण तयार केले आहे. जनतेने त्यांचे कौतुक सुरू केले आहे. यामुळे आपण हा निर्णय घेतला आहे आणि पक्ष संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन राजीव टोपन्नावर यांनी दिले.
आम आदमी पक्षात प्रवेश केलेल्या राजीव टोपन्नावर यांना उत्तर कर्नाटक भागातील संघटनेची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते.
उल्लेखनीय म्हणजे, भाजपमध्ये असतानाच राजीव टोपन्नावर यांनी सरकारच्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीला विरोध केला आणि आम आदमी पक्षाने राजीव टोपन्नावर यांना नव्या पक्षाने आपली द्वारे खुली केली आहेत. आता ते भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणावर प्रहार करणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *