बेळगाव : बेळगाव कॅम्प पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल मल्लसर्जु अंकलगी (४५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मल्लसर्जु नेहमीप्रमाणे ड्युटी संपवून रात्री जेवण करून झोपायला गेले. आज उशिरापर्यंत ते उठले नसल्याने कुटुंबीय त्याला उठवण्यासाठी गेले असता मल्लसर्जुचे निधन झाल्याचे समजले. पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.