बेळगाव : धर्मवीर संभाजी नगर वडगाव येथील श्री गणेश-मारूती मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सिद्धार्थ नेत्रालय तसेच विजया आर्थो ट्रॉमा सेंटर यांच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. डोळ्यांचे विकार, मोतीबिंदू तसेच रक्तदाब, मधुमेह, हाडांचे विकार यांची तपासणी करून औषधांचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी मंदिरचे विश्वस्त विनायक मोरे यांनी प्रास्ताविक केले. ट्रस्टचे अध्यक्ष मारूती जायण्णाचे व उपाध्यक्ष भाऊराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन डॉक्टरांचे स्वागत करण्यात आले. डॉ. सिद्धार्थ पुजारी, डॉ. मंजुनाथ, डॉ. बसिरा, अरुण पाटील आणि टीमने आरोग्य तपासणी केली. अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. विनायक मोरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रसाद यळ्ळूरकर, परशराम नावगेकर, नारायण केसरकर, श्रीधर (बापू) जाधव, प्रदीप शट्टीबाचे, परशराम बगाडे, सचिन बांदिवडेकर, सूरज पाटील, शिवाजी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.